पळसदेव मंदिर आणि कुगाव गढी वारसा सहल (Palasdeo Temple Heritage Walk)



पळसदेव मंदिर - 
वर्षभर उजनी धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात गुडूप होणारे हे सुंदर मंदिर वर्षभरात पाणी ओसरल्यावर २-३ महिन्यांच्यासाठी पर्यटकांना खुले होते. पळसदेव हे प्राचीन मंदिर असून साधारणपणे १२ व्या शतकात याची उभारणी झाली. १९७५ मध्ये उजनी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्यानंतर हे धरण पाण्यात गेले ते आपल्यासोबत अप्रतिम शिल्पकलेचा नमुना घेऊनच. पुढे सन १६८० मध्ये बाबुराव जहागीरदार शेजारील धर्मशाळेचे आणि मंदिराच्या प्राकाराचे बांधकाम केले. मंदिर परिसरात अनेक वीरगळ, भग्न नंदी, दशावतार शिल्पपट, उमा-महेश्वर शिल्प, सतीशिला आणि मंदिराचे अवशेष पडले आहेत. मंदिरावर रामायणातील अनेक शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या एका खांबावर मंदिराच्या बांधकामचे साल सांगणारा एक शिलालेख सुद्धा आहे.
कुगाव गढी- 
पळसदेव मंदिराच्या काही अंतरावर पुढे कुगावची गढी आहे. पळसदेव प्रमाणेच ही गढीसुद्धा उजनीअर्पण झाली आहे. सरदार इनामदार यांची ही गढी असल्याचे सांगितले जाते. गढीची पडझड झाली असली तरी आजही हिचे बरेसचे बांधकाम शाबूत आहे. येथून आजूबाजूच्या परिसराची उत्तम फोटोग्राफी करता येते.
सहल ही संपूर्ण दिवस असणार आहे.
सहलीच्या फी मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.
१. पुणे ते पुणे बस प्रवास
२. सकाळचा चहा आणि नाश्ता
३. दुपारचे जेवण
४. संध्याकाळचा चहा
५. मंदिराची इत्यंभूत माहिती
६. होडीची गरज पडल्यास त्याचे भाडे
एकत्र भेटण्याचे ठिकाण - शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड
ज्यांना ज्यांना या सहलीला यायचे असेल त्यानी खालील क्रमांकावर मेसेज करावा.
अनुराग – ८३०८८१०१९४
शंतनु - ७०२०४०२४४६

0 comments: